अक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर धरण परिसराची वन्यजीवांचे रक्षण-संरक्षण करून एक उत्तम पक्षी निरीक्षण केंद्र आणि पर्यटन स्थळ व्हावे, अशी पक्षी पर्यटकांची मनापासून इच्छा आहे. यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी, मेतन फाउंडेशनचे डॉ. व्यंकटेश मेतन, विमानतळ प्राधिकरणाचे सज्जन निचळ, सेवानिवृत्त अभियंता प्रल्हाद कांबळे, "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, रियाज पटेल, नागनाथ उदंडे, प्रा. अमोगसिद्ध चेंडके आदींनी या परिसराची पाहणी केली.